Uncategorized
Perpetual Composting Drum ( Aviratpatra – अविरतपात्र )
₹5,500.00
Shipping & Delivery charges are extra. ( Depend on Delievery Location. )
The price is Ex Mumbai. Transportation charges will be extra at actuals on ‘to pay‘ basis.
शिपिंग आणि वितरण शुल्क अतिरिक्त आहेत. ( वितरण स्थानावर अवलंबून.)
सुमुख जोशी –
मी जेव्हा घरी आणयचे ठरवले त्यावेळी मनात खूप प्रश्न होते. हे कितपत चालेल? ह्याला मुंग्या, माश्या, पाली झुरळ लागतील का? जेव्हा मी हे माझ्या कुटुंबातील सदस्यांशी बोललो तेव्हा असेच मत त्यांचेही होते. कचरा उचलणे आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे हे काम सरकारच आहे. आपण आपले काम करावे. असे सल्ले मलाही मिळाले. पण माझ्या मनाशी एक निश्चय होता की जर ताम्हणकर सारखे सामन्य व्यक्ती हे करु शकते म्हणजे गेली १५ वर्ष करतय तर आपण का नाही सुरुवात करु शकत.
आणि अविरत पात्र घरी आले. केवळ रोजची १० मिनीटे (जास्तीत जास्त) देउन अपा आमच्या घरी गेली २ वर्ष अव्याहत पणे चालू आहे. अडचण असल्यास ताम्हणकर सर कुठल्याही वेळेला उपलब्ध आहेतच.
परंतू हे अपा हे आपण सर्वच वापरु लागलो तर डंपिंग ग्राउंड अशी कुठली व्यवस्थाच करायची गरज लागणार नाही.
सतीश जोशी –
अविरत पात्र ही संकल्पना आणि पात्राची रचना छान. सुरुवातीला कचरा आणि विरजण व्यवस्थित कार्यरत होण्याकरता १५ दिवस लागतात. या पहिल्या काही दिवसातच चिलटे यांचा त्रास होऊ शकतो पण ताम्हणकर यांनी दिलेले द्रावण शिंपडून तो दूर होतो. सोबत दिलेले विरजण पण थोडे वापरावे लागते.
१५ दिवसानंतर उत्तम कंपोस्ट तयार होऊ लागते. Fermenting culture बरोबरच गांडूळे पण मजेत राहून कार्य साधतात. नंतर कोणतेही द्रावण , चिलटे किंवा विरजण, वापरावे लागत नाही. Process set होते.
पात्रामध्ये भोके असल्याने हवा खेळती राहते.
सर्वात महत्वाचे म्हणजे काही अडचणी आल्या तर स्वतः ताम्हणकर त्या सोडवायला तत्पर असतात.
ह्या पर्यावरणास पोषक अशा अविरत पात्राला पर्याय नाही!
R. R. Patankar –
बऱ्याच वर्षा पासून मनात जैविक ( ओल्या) कचऱ्या बद्दल काही करावे व विचार करत होतो. लहान सहान प्रयत्न केले पण मनासारखे घडत नव्हते. अचानक, एक दिवस अविरत पातरा बद्द्ल माहिती मिळाली. संपूर्ण माहिती घेऊन मग अ.पा. घेतल. आज जवळपास ६ महिने अ.पा. वापरत आहे.
ह्यातून सहज रित्या तयार होणारे खत/माती ही घरातील कुंड्यांमध्ये वापरल्याने झाडं छान बहरू लागली.
Thanks to Shri. Tamhankar ( the garbage man) for his continued support.
Wish every body thinks like this and we can move to a clean and green environment.???R. R. Patankar, Pune
हेमंत नवरे –
आपला परीसर स्वच्छ म्हणजे निर्मळ राखावा अशी माझ्या आजीची शिकवण. गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरण हा विषय परिचीत झाला तो दिलीप कुलकर्णी, अभिजीत घोरपडे इत्यादींमुळे. त्यात भर पडली ती माझे शाळा सोबती श्री कौस्तुभ ताम्हनकर यांची. आम्हा शाळासोबत्यांच्या एका भेटीत त्यांनी ” शून्य कचरा मोहीम ” हे पुस्तक मला भेट दिले. ते वाचल्यावर त्यात उल्लेख केलेल्या अविरत पात्राची ( अपा ) महती मला समजली. आणि पंधरा दिवसातच अपा आमच्या घरी आले. सोबत स्टँड, बायोकल्चर ( विरजण ) आणि डिओ ची बाटली देखील. पण अपा सुरू करायला मुहूर्त काही मिळेना. तो मिळाला शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2017 रोजीचा. ताम्हनकर यांनी घरी येऊन सर्व माहीती देऊन अपा सुरू करून दिले तेव्हाचा !
जरी ” येथे कचरा तयार होत नाही ” अशी पाटी आमच्या प्रवेशदारावर दिसत नसली तरी घराच्या बाल्कनीत ठेवलेले हे अपा गेले 16 महिने आम्ही वापरत आहोत. क्वचित प्रसंगी घरात उरलेले अन्न आणि घरात तयार होणारा सर्व ओला कचरा आम्ही यात टाकतो. भाज्यांची देठे, कणसाची पाने वगैरे कचरा मात्र कापून बारीक करून टाकावा लागतो. अधून मधून पाणी टाकावे लागते. आमच्या शंका कुशंका व अपा वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यास ताम्हनकर तयार असतात. whatsApp वर किंवा फोनवर शंका निरसन होते असा माझा अनुभव आहे. माझा हा पर्यावरण क्षेत्रात काम करणारा मित्र अशीच तत्पर सेवा इतरांना देखील देत असणार कारण त्याचे स्वतः चे घर काय अन आपले काय, ते शून्य कचरा मोहीमेत सामील असावे ही त्याची असणारी तळमळ ! घरातील उसाच्या चोयट्या, कणसाचे भुंडे असा मेगा साईज कचरा वगळता बाकी सर्व ओला कचरा या अपा मध्ये जाऊन आमच्या अंगणातील फुलझाडांना दर सहामाहीस उत्तम खत मिळवून देतो. सुक्या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न आमच्या भागातील भंगारवाल्यांनी कधीचा सोडवला आहे.
ताम्हनकर यांनी अपा ची नवी सुधारीत आवृत्ती नुकतीच वापरात आणली आहे असे कानावर आले आहे.
आमचा हा शाळासोबती अपा बाय बॅक स्कीम आणतो की काय याची उत्सुकता आहे. ती जरी नसली तरी अपा चे नवे व्हर्जन आमच्या घरी येणारच आहे.
आमच्या सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मार्गी लागतो आहे. त्यावेळी नियमानुसार व्हर्मीकल्चर वगैरे करावे लागणार आहेच. म्हणजे एक भलेमोठे अपा आमचा परीसर स्वच्छ ठेवणार तर !
हेमंत नवरे पुणे ?
Mukund Khare –
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मी अपा घरी आणले व शून्य कचरा संकल्पनेचे माझे पुढचे पाऊल पडले। गेली ३/४ वर्षे ओला कचरा खतनिर्मिती संकल्पना माझ्या समजुतीप्रमाणे चुकतमातत करीत होतो। अपा वापराने खतनिर्मिती उच्च प्रतीने होता आहे व या खताच्या वापराने रोपांची वाढ जोमदार होते असा अनुभव आहे।
Mukund Khare