Perpetual Composting Basket ( Aviratpatra / अविरतपात्र ) for Society ( More than 15 Flats)

ASK FOR PRICE !

Category:

2 reviews for Perpetual Composting Basket ( Aviratpatra / अविरतपात्र ) for Society ( More than 15 Flats)

 1. महेश खरे

  मोठ्या अविरतपात्रामुळे सोसायटीची कचरामुक्ती*

  मी गेली अनेक वर्ष कचाऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रयोग करत होतो. स्त्री मुक्ती संघटनेचा चेंबूर येथील प्रकल्प, कै. आर. टी. दोशी यांचा गच्चीवरील कचऱ्यात शेती प्रकल्प, पुण्याचे काही प्रयोग पाहून मी डोंबिवलीला आमच्या अंगणात विघटनशील कचऱ्यापासून खत करण्याचे प्रयत्न करत होतो. पण त्यात म्हणावे असे सातत्याने यश मिळत नव्हते. मग माझी कौस्तुभ ताम्हणकर यांच्याशी ओळख झाली. तेही या क्षेत्रात प्रयोग करत होते आणि त्यांना यश मिळालं होतं. त्यांच्या बास्केट प्रकारच्या अविरतपात्रात खत होत असूनही त्यांनी अधिक परिणामकारकतेसाठी प्रयोग सूरू ठेवले आणि त्यातून तयार झाले सिलेंडर प्रकारचे अविरतपात्र.

  मला ताम्हणकरांनी व्हॉट्स ॲपवर या नवीन साधनाचे फोटो व माहिती पाठवली. त्याचा सोपेपणा, देखभालविरहितता, सुबकता पाहून मी खूष झालो. ठाण्याला जाऊन अविरतपात्र पाहिले. हे अविरतपात्र एका कुटुंबातील कचऱ्याचे खत करण्यासाठी होते. मी लगेच ताम्हणकरांना विचारलं, “हे, सोसायटीत तयार होणारा विघटनशील कचरा सोसायटीच्या आवारातच खत होऊ शकेल अशा मोठ्या आकारात मिळू शकेल का ?” ताम्हणकर म्हणाले, “माझ्या मनात आहे. पण तशी तयारी कुणी दाखवायला हवी.” मी लगेच म्हटलं, “आमच्याकडे करता येइल.”

  त्यानंतर सुमारे दीडदोन महिन्यांनी तम्हणकरांनी आमच्यासाठी २००लीटर क्षमतेचे मोठे अविरतपात्र तयार केले. ते बसवण्यासाठी ते स्वत: ठाण्याहून डोंबिवलीला आले. पुढेही अविरतपात्राच्या कामात काही कमतरता आहे असे वाटले तेव्हाही त्यांनी स्वत: लक्ष घालून ती लगेच दूर केली.

  आता आमच्या सोसायटीतील सर्व विघटनशील कचऱ्याचे आमच्या आवारातच विघटन होते. सोसायटीतील प्रत्येक घरी ओला ( विघटनशील ) व कोरडा ( अविघटनशील ) कचरा वेगळ्या बादलीत टाकला जातो. सफाई कर्मचारी तो वेगवेगळ्या बदल्यांमध्ये ताब्यात घेतात. ओला कचरा अविरतपात्रात टाकतात. कोरडा कचरा महानगरपालिकेची गाडी घेउन जाते. सोसायटीतून बाहेर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण २० टक्क्यांवर आले आहे. अविरतपात्रातून रोज सुमारे अर्धा किलो खत मिळू लागले आहे.

  प्रत्येक सोसायटीमधे अशी मोठी अविरतपात्रे बसावली गेली तर कचऱ्याचा व डंपिग ग्राउंडचा प्रश्न सुटायला नक्की मदत होइल.

  – महेश खरे

 2. मैत्री आनंद सोसायटी, ठाणे

  आपण दररोज आपल्या विविध क्रियांमुळे ओला आणि सुका कचरा निर्माण करीत असतो. नंतर तो म्युन्सिपालीटीला देउन टाकतो. हे झालं कि आपला परिसर, घर स्वच्छ झाल असं समजतो. पण जेव्हा आपण अशा रीतीने कचरा बाहेर टाकतो तेव्हा आपण खुप मोठी समस्या निर्माण करतो. जगभरच्या म्युन्सिपालीटीना हा कचरा टाकायच्या जागा आता संपायला आल्यात. हे आपण नेहमी वाचत असतो. ह्याचा विचार करताना आमच्या मैत्री आनंद सोसायटीत ह्या समस्येवर आपण काही करू शकतो का याचा विचार सुरु होता. आपल्याकडून एक छोटीशी सुरुवात म्हणून आम्ही मग आपल्या ओल्या कचर्याची तरी विल्हेवाट शास्त्रीय रीतीने लावू शकतो का याचा विचार सुरु झाला. यातूनच मग आमची श्री. ताम्हणकर यांची भेट झाली आणि अविरत पात्र वापरावयाच ठरलं. जेणेकरून या कचर्याचे जैविक विघटन होऊन त्याची योग्य विल्हेवाट लावता येईल. प्रथम आम्ही आमच्या रहिवाशांसाठी श्री. ताम्हणकर यांच्याबरोबर एक बैठक घेतली. सरांनी मग शून्य कचरा हि संकल्पना समजावून सांगीतली. त्यांनी त्यंच्या स्वतःपुरती कशी अमलात आणली हेही सांगितले. ह्या बैठकीनंतर ठरलं कि आपण आपल्या सोसायटीत अविरत पात्र बसवयाचच.
  पण मुख्य समस्या होती ती ओल्या आणि सुक्या कचर्याचे वर्गीकरण. वर्षानुवर्षांची कचरा एकत्र टाकण्याची सवय मोडण जरा कठीणच होत. मग आम्ही हे वर्गीकरण कसं कराव याचा प्रचार सुरु केला. त्यासाठी सूचना फलकावर ओला आणि सुक्या कचरा म्हणजे काय याची यादीच लावली. आधी लोकांना आव्हान करून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी समजावले. नंतर आम्ही आमच्यातर्फे वेगळ्या पिशव्या देवून त्यात असलेला ओला कचराच उचलला जाईल असे सांगून लोकांची मानसिकता तयार केली. त्यानंतर आव्हान होता कचरा गोळा करणार्या सेवकांचे. त्यांचे समुपदेशन करून लोकांनी टाकलेल्या ओल्या कचर्यात चुकून काही आले असेल तर ते वेगळे करण्याची तयारी केली. ह्या पूर्वतायारीनान्तारच अविरत पात्र श्री. ताम्हणकर यांच्या मदतीने निर्माण केलं.
  १५ ऑगस्टला झेंडावंदनानंतर त्याचे सोसायटीतील महिलांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेली चार महिने हे आम्ही यशस्वीरित्या करीत आहोत. श्री. ताम्हणकर यांची मदत तर महत्वाची होतीच. पण आमचे अध्यक्ष श्री. दांडेकर यांचा सक्रीय पुढाकार आणि सर्व सदस्यांचा सकारात्मक सहभाग यामुळे हे शक्य झाले.
  आज आमची सोसायटी हा पर्यावरणप्रेमी प्रकल्प राबवत असल्याचा रास्त अभिमान वाटतो. याशिवाय आमच्या सर्व tube lights ह्या LED च्या केल्या आहेत. सदस्यांना जाणारी सर्व माहिती, मासिक बिले आता email द्वारे दिले जाते. ज्यायोगे आम्ही कागदाचा वापार नियंत्रित करून पर्यावरण रक्षणात मदत करतो. आता सौर्य उर्जे सारखे प्रकल्प हाती घेऊन अजून एक पाउल पर्यावरणाच्या दिशेने टाकणार आहोत.
  शशांक भालकर
  मैत्री आनंद सोसायटी, ठाणे

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *